Join us  

ना थलैवा, ना बाहुबली; 'साऊथ'चे ५ हुकमी एक्के बॉक्स ऑफिसवर FLOP

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 9:52 AM

1 / 5
साऊथ सुपरस्टार 'रजनीकांत' ज्याला जनता अगदी देवच मानते तो सुद्धा सध्या यशासाठी स्ट्रगल करतोय. रजनीकांतचे नुकतेच रिलीज झालेले दोन चित्रपट फार काही यश मिळवू शकले नाहीत. २०२० मध्ये आलेला 'एआर मुरुगदोस दरबार' आणि २०२१ चा 'सिवा अन्नथे' हे दोन्ही फ्लॉप झाले.आता लवकरच रजनीकांत 'जेलर' या सिनेमात दिसणार आहे. १४ एप्रिल २०२३ मध्ये सिनेमा रिलीज होत आहे.
2 / 5
मेगास्टार 'चिरंजीवी' देखील मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यास अपयशी ठरत आहे. चिरंजीवीचा नुकताच रिलीज झालेला 'गॉडफादर' सिनेमा गर्दी खेचू शकलेला नाही. विशेष म्हणजे या सिनेमात सलमान खाननेही कॅमिओ केला आहे. चिरंजीवी आणि रवी तेजा यांचा 'वॉल्टेअर वीरैय्या' हा चित्रपट या वर्षी येत आहे.
3 / 5
मल्याळम सिनेमाचा मेगास्टार 'दृश्यम' फेम 'मोहनलाल' याचा २०१९ साली 'लुसिफर' सिनेमा आला होता. या सिनेमाने तुफान कामगिरी केली होती. २०० कोटींचा गल्ला जमवणारी ही पहिली मल्याळम फिल्म ठरली. त्यानंतर मोहनलाल यांनी ओटीटी क्षेत्रात काम केले मात्र म्हणावे तसे यश मिळाले नाही.
4 / 5
मास महाराजा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'रवी तेजा'ची जादू ओसरत चालली आहे. रवी तेजाचा यावर्षी आलेला सिनेमा 'खिलाडी', 'रामराव ऑन ड्युटी' आणि नुकताच रिलीज झालेला 'धमाका 'हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत.
5 / 5
'बाहूबली' सिनेमामुळे अभिनेता 'प्रभास' जगभरात प्रसिद्ध झाला. मात्र त्यानंतर आलेले सर्व चित्रपट आपटले. 'साहो', 'राधे श्याम' हे चित्रपट चालले नाहीत. तर आता प्रभास 'आदिपुरुष' या बिगबजेट सिनामात दिसणार आहे.तसेच आगामी 'प्रोजेक्ट के' सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, यांच्यासोबत प्रभास स्क्रीन शेअर करणार आहे.
टॅग्स :सिनेमाप्रभासचिरंजीवी