Join us

समांथानं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, एनजीओतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:40 IST

1 / 10
दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभू हिने यंदाची दिवाळी एका अत्यंत खास आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली.
2 / 10
समांथाने एका एनजीओला (NGO) भेट देऊन मुलांसोबत हा सण साजरा केला. तिने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं.
3 / 10
समांथाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
या फोटोंमध्ये ती अनेक मुलांसोबत आनंदात दिवे लावताना, खेळ खेळताना आणि त्यांच्यासोबत मजा करताना दिसत आहे.
5 / 10
एनजीओतील मुलांनीही समांथाला एक खास सरप्राइज दिलं. मुलांनी समंथाच्या चित्रपटांमधील गाण्यांवर सादरीकरण केलं. हे पाहून समांथा आनंदित झाली.
6 / 10
या मुलांनी फुलांचा वापर करून जमिनीवर 'समांथा' असे तिचे नाव लिहिले होते. समांथाने मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवला.
7 / 10
या सर्व फोटोंसोबत समंथाने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने एनजीओचे आभार मानले आणि मुलांसोबत दिवाळी साजरी करताना मिळालेला आनंद व्यक्त केला.
8 / 10
दिवाळीनिमित्त समांथानं केलेल्या या कृतीचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या पोस्टवर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
9 / 10
दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये मोठे नाव असलेली समांथा सध्या बॉलिवूडमधील प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
10 / 10
सध्या ती राज आणि डीके यांच्या 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' यात काम करत आहे. यात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीदिवाळी २०२५