Join us  

जय श्रीराम...! 'सिया के राम' ते 'आदिपुरुष'; OTTवर बघता येतील रामायणावर आधारीत 'हे' खास शो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 5:34 PM

1 / 10
सध्या देशात सर्वत्र अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम सुरू आहे. २२ जानेवारीला पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी देशवासी उत्सुक आहेत.
2 / 10
अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून रामायणाचा इतिहास दाखवला गेला आहे. हे खास शो आणि चित्रपट तुम्ही ओटीटीवरही पाहू शकता.
3 / 10
१९८७ साली टीव्हीवर प्रसारित होणारी रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणारं हे रामायण तुम्ही घरबसल्या हॉटस्टार या ओटीटी अॅपवर पाहू शकता.
4 / 10
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी मुख्य भूमिकेत असलेल्या 'रामायण' ही मालिकाही गाजली होती. २००८ साली एनडीटीव्ही इमॅजिनवर प्रसारित होणारा हा शो अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
5 / 10
रामायणानंतर 'सिया के राम' या मालिकेलाही प्रसिद्धी मिळाली होती. स्टार प्लसवर लागणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता हॉटस्टारवर ही मालिका तुम्ही पाहू शकता.
6 / 10
'राम सिया के लव्ह कुश' ही मालिकाही प्रभू श्रीराम आणि त्यांच्या मुलांवर आधारित होती. २०१९मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेचे १४१ एपिसोड आहे. जिओ सिनेमावर ही मालिका उपलब्ध आहे.
7 / 10
प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या मुलांवर आधारित असलेला 'लव्ह कुश' हा सिनेमाही आला होता. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात जितेंद्र मुख्य भूमिकेत होते. जया प्रदा, अरुण गोविल, दारा सिंग अशी स्टारकास्ट होती. हा सिनेमा झी५वर पाहता येईल.
8 / 10
अलिकडेच प्रदर्शित झालेला ओम राऊतचा 'आदिपुरुष' सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत होता. या सिनेमात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. वादग्रस्त असूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
9 / 10
रामायणावर अनेक अॅनिमेटेड शोज ही प्रदर्शित झाले आहेत. 'हॉटस्टार'वरील 'द लिजेंड ऑफ हनुमान' हा शो लोकप्रिय ठरला होता.
10 / 10
अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला 'राम सेतू' या सिनेमाही चर्चेत होता. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातून राम सेतूवर भाष्य करण्यात आलं होता. थोडा वेगळा विषय मांडणारा हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर अवश्य बघा.
टॅग्स :राम मंदिरटिव्ही कलाकाररामायणआदिपुरूष