Join us  

लोकप्रिय गायिका आशा भोसले आहेत यशस्वी व्यवसायिक; दुबईमध्ये करतात 'हा' व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:34 AM

1 / 12
आपल्या आवाजाने कानसेनांना तृप्त करणाऱ्या लोकप्रिय गायिका म्हणजे आशा भोसले.
2 / 12
आजवर त्यांनी वेगवेगळ्या ढंगातील, अंदाजातील गाणी सादर करुन कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 12
संपूर्ण जगभरात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. विशेष म्हणजे आवाजाच्या जोरावर नाव कमावणाऱ्या आशा भोसले एक व्यावसायिकदेखील आहेत.
4 / 12
आशा भोसले केवळ गायिका नसून त्या प्रसिद्ध व्यावसायिकदेखील आहे. सातासमुद्रापार त्यांनी त्यांचा व्यावसाय सुरु केला आहे.
5 / 12
आशा भोसले यांचं दुबईमध्ये एक रेस्टॉरंट आहे हे फार कमी जणांना माहित आहे. नुकताच त्यांनी या रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे ही गोष्ट अनेकांना ठावूक झाली.
6 / 12
आशा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाक करताना दिसून येत आहेत.
7 / 12
'Asha's Restaurants' असं त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव असून जवळपास २० वर्षांपूर्वी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
8 / 12
दुबईमधील WAFI मॉलमध्ये त्यांचं हे रेस्टॉरंट असून अशा अनेक ठिकाणी त्यांनी हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे.
9 / 12
विदेशाप्रमाणेच देशातही काही ठिकाणी आशा भोसले यांचं हे रेस्टॉरंट पाहायला मिळतं.
10 / 12
आशा भोसले यांनी दुबईमध्ये त्यांचं पहिलं आऊटलेट सुरु केलं होतं.
11 / 12
आशा भोसले बऱ्याचदा स्वत: या रेस्टॉरंटला भेट देत असून तेथे खवय्यांसाठी स्वत:च्या हाताने पदार्थही तयार करतात.
12 / 12
आशा भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
टॅग्स :आशा भोसलेसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा