Join us  

Shriya Pilgaonkar Birthday : सचिन पिळगांवकरांची 'एकुलती एक' कशी बनली ओटीटी माध्यमाची 'मल्लिका'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:27 AM

1 / 7
ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar). सचिन आणि सुप्रिया या मराठीतील सुपरहिट कपलची ती लाडकी आणि एकुलती एक लेक. श्रीया आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 7
श्रिया अभिनय क्षेत्रात यायच्या आधी प्रोफेशनल स्विमर होती. तिने शालेय जीवनात अनेक मेडल्सही जिंकले. तिला वेगवेगळ्या भाषा शिकण्याचीही आवड होती. प्रोफेशनल ट्रान्सलेटर होण्याची तिची इच्छा होती. तिने जपानी भाषेचा अभ्यास केला आहे.
3 / 7
मात्र काही वर्षांनी तिचं मन बदललं. श्रियाने झेव्हियर्स कॉलेजमधून सोशिओलॉजीचा अभ्यास केला. तसंच तिने कत्थकचंही प्रशिक्षण घेतलं. श्रिया लहानपणापासूनच खूप हुशार होती.
4 / 7
श्रियाने वयाच्या पाचव्या वर्षीच बालकलाकार म्हणून अभिनय केला आहे. 'तू तू मै मै' या मालिकेत तिने बिट्टू हा मुलाचा रोल केला होता. तर 2012 मध्ये तिने स्टेज डेब्यू केला. 'फ्रीडम ऑफ लव्ह' या नाटकात तिने काम केले. यानंतर तिने 2013 मध्ये मराठी चित्रपट 'एकुलती एक' मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
5 / 7
2016 मध्ये श्रियाने शाहरुख खानच्या 'फॅन' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. दिग्दर्शक मनीष शर्माने 750 मुलींची ऑडिशन घेतली. त्यातून श्रियाची निवड झाली होती. या सिनेमात तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं.
6 / 7
मात्र श्रियाला खरी प्रसिद्धी मिळाली ती ओटीटी वरील 'मिर्झापूर' या सिरीजमधून. या लोकप्रिय सिरीजमध्ये तिने स्वीटी ही भूमिका साकारली जी प्रचंड गाजली. बिंधास्त मुलीचं हे पात्र होतं. या सिरीजमधून तिने ओटीटीवर पदार्पण केलं.
7 / 7
यानंतर श्रिया अनेक ओटीटी सिरीजमध्ये झळकली. 'बीचम हाऊस','द गॉन गर्ल','क्रॅकडाऊन','गिल्टी माइंड्स','द ब्रोकन न्यूज' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'ताजा खबर' सिरीजमध्ये तिने काम केले. आज श्रियाला ओटीटीची मल्लिका असंही म्हटलं जातं.
टॅग्स :श्रिया पिळगावकरसचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरपरिवार