IN PICS : करिअरच्या सुरुवातीलाच असं काही झालं की हादरून गेली होती सोनल वेंगुर्लेकर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 16:32 IST
1 / 8‘शास्त्री सिस्टर्स’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरचा आज वाढदिवस.2 / 8मालिकांमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी सोनल मूळची मुंबईची.3 / 8 महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली. पण तिच्या करीयरच्या सुरुवातीला तिच्यासोबत असं काही झालं की त्यामुळे ती पूर्णपणे हादरून गेली होती.4 / 8मीटू मोहिमेदरम्यान सोनलने आपबीती सांगितली होती. यादरम्यान सोनलने प्रसिद्ध फोटोग्राफर राजा बजाजवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.5 / 8अभिनय येत नसला तरी तू दिसायला सुंदर आहेस. त्यामुळे तुझी काम करायची इच्छा असेन तर काम द्यायला तयार आहे फक्त तू नग्न होऊन माझ्यासमोर ये, असं बजाजनं सांगितल्याचे तिने म्हटले होते. 6 / 8तुला तांत्रिक विद्या शिकवेन असं सांगत बजाजने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सोनलने केला होता. यामुळे भेदरलेल्या सोनलने आरडाओरडा करत तिथुन पळ काढला होता.7 / 8लॉकडाऊन काळात सोनलने आर्थिक संकटाचा सामना केला. या काळात ती इतकी खचली होती की, अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार आल्याचे तिने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते.8 / 8अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर ‘शास्त्री सिस्टर’ मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. सोनलने दिल दोस्ती डान्स, शास्त्री सिस्टर्स, ये वादा रहा आणि शास्त्री सिस्टर्स अश्या मालिकांमध्ये काम केले आहे.