शर्मिला टागोर यांना होता फुप्फुसाचा कॅन्सर, किमोथेरेपी न घेताच झाल्या बऱ्या; लेक सोहाने सांगितला कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:23 IST
1 / 7बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला त्या म्हणजे शर्मिला टागोर. अभिनयासोबत त्यांनी सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. 2 / 7शर्मिला टागोर यांनाही कॅन्सरने गाठलं होतं. मात्र वेळीच निदान झाल्याने किमोथेरेपी न घेता त्या यातून बऱ्या झाल्या. 3 / 7शर्मिला टागोर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. 4 / 7'प्रत्येकाला ज्या कठीण परिस्थितीतून जावं लागतं तसं माझ्या कुटुंबालाही जावं लागलं होतं', असं सोहा नयनदीप रक्षित यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 5 / 7'माझ्या आईला स्टेज झिरो फुप्फुसाच्या कॅन्सरचं निदार झालं होतं. ती अशा काही मोजक्या लोकांपैकी होती ज्यांना खूप लवकर याचं निदान झालं'. 6 / 7'तिने किमोथेरेपी वगैरे काही घेतलं नाही. तिच्या शरीरातून हा आजार काढून टाकण्यात आला आणि आता सुदैवाने ती आता बरी आहे', असं सोहाने सांगितलं. 7 / 7सोहाने शर्मिला टागोर यांच्याबद्दल हे सांगितल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.