Join us  

'केदारनाथ'च्या शूटिंगदरम्यान सारा-सुशांत पडले होते एकमेकांच्या प्रेमात, या कारणामुळे झाला नात्याचा शेवट, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:14 PM

1 / 8
केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचे नाव खूप चर्चेत आले होते. त्यावेळी ते दोघे बॉलिवूडमधील नवीन लव्हबर्ड बनले होते पण अचानक सगळं संपले.
2 / 8
सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा सुशांतने साराला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिला पाहत राहिला होता. पहिल्यांदा ते दोघे केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि आई अमृता सिंगसोबत भेटले होते.
3 / 8
सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या भेटीतच सुशांतने सारा अली खानला इंप्रेस केले होते. सारादेखील सुशांतचे केअरिंग नेचर पाहून इम्प्रेस झाली होती.
4 / 8
सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते.
5 / 8
हल्ली सारा अली खान व सुशांत सिंग राजपूत यांचा कोणता ना कोणता फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी खास होते, याचा अंदाज लावला जात आहे.
6 / 8
सूत्रांच्या माहितीनुसार केदारनाथ चित्रपटाच्या रॅपअप पार्टीमध्येदेखील सारा आणि सुशांतची बॉण्डिंग पाहण्यासारखी होती. इतकेच नाही तर साराने सर्वांसमोर सुशांतची खूप प्रशंसा केली होती.
7 / 8
सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूतच्या फार्महाउसवरील केअरटेकरने सांगितले की, सारा अली खान त्यांच्या फार्महाउसवर सुशांतला भेटण्यासाठी येत होती.
8 / 8
तसेच सुशांतचा रुममेट सॅम्युअल हाओपिकनेदेखील सांगितले होते की, सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र साराने कोणत्यातरी दबावामुळे सुशांतसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.
टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूतकेदारनाथअमृता सिंग