Join us

रितेश देशमुखच्या 'बँजो'चा टीझर रिलीज

By admin | Updated: May 30, 2016 19:02 IST

अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फखरी यांच्या बहुचर्चित 'बँजो' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुद्द रितेश देशमुखने यासंबंधीची माहिती सोशल मिडियाच्या

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -  अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फखरी यांच्या बहुचर्चित  'बँजो' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खुद्द रितेश देशमुखने यासंबंधीची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.
 'बँजो' चित्रपटात रितेश देशमुखचा हटके लूक पहायला मिळणार आहे. पहिल्‍यांदाच तो लाँग हेअरच्‍या स्‍टाईलमध्‍ये बँजो वाजवताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर रितेश देशमुखने ट्विटरवरुन शेअर केला असून यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनच्या आवाजात रितेश देशमुखच्या भूमिकेची ओळख करुन देण्यात आहे.  तसेच, टीझरच्या लिंकसोबत 'बँजो की दुनिया का बच्चन' असे त्याने ट्विट केले आहे. रितेश देशमुखसोबतच अभिनेत्री नर्गिस फखरीही चित्रपटात हटके लूकमध्ये दिसणार आहे. 
दिग्‍दर्शक रवी जाधव यांचा  'बँजो' हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. त्‍यामध्‍ये रितेश देशमुख एका मराठी स्‍ट्रीट म्‍युझिशियनची भूमिका साकारत आहे. रितेश देशमुखने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट केले आहेत. 'बँजो' या चित्रपटात त्‍याची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.