By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:52 IST
1 / 7रश्मीका मंदाना (Rashmika Mandanna) साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील फेमस चेहरा आहे. तिने कमी वेळात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. रश्मीकाने २०१६ मध्ये कन्नड सिनेमा 'किरिक पार्टी'मधून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात केली होती. तिने साऊथच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2 / 7सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंगही भरपूर आहे. रश्मीका मंदाना दुसऱ्या स्टार्सप्रमाणे लक्झरी लाइफ जगते. तिच्या कोट्यावधी रूपयांच्या लक्झरी कार आणि घरं आहेत. चला जाणून घेऊ साऊथच्या या फेमस अभिनेची किती आहे एकूण संपत्ती.3 / 7मीडिया रिपोर्टनुसार, रश्मीका मंदानाची एकूण संपत्ती जवळपास ३० कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. ती कन्न्ड सिनेमांची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिची महिन्याची कमाई ३० लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. तसेच ती एका सिनेमासाठी ३ ते ४ कोटी रूपये मानधन घेते.4 / 7टॉलिवूड अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कर्नाटकमध्ये एक घर आहे. ज्याची किंमत ८ कोटी रूपये आहे. त्यासोबतच तिचं हैद्राबाद आणि मुंबईतही घर आहे.5 / 7रश्मीका मंदानाला कारने प्रवास करण्याची फार आवड आहे. तिच्याकडे ४ लक्झरी कार्स आहेत. त्यात Audi Q3(60 लाख रूपये), टोयोटा इनोवा, Mercedes-Benz C-Class(१ कोटी रुपये) आणि Hyundai Creta(२५ लाख रुपये) या कार्सचा समावेश आहे.6 / 7साऊथ इंडियन अभिनेत्री रश्मीकाला स्टायलिश फुटवेअऱ आणि बॅग्सची देखील आवड आहे. तिच्या कपाटात शूज आणि ब्रॅंडेड बॅग भरून आहेत. एका अंदाजानुसार, रश्मीकाच्या एका बॅगची किंमत ३ लाख रूपये आहे. 7 / 7रश्मीला मंदानाला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा त डान्स, जिम आणि प्रवासात आपला वेळ घालवते. तिचा सर्वात आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी आहे तर सर्वात आवडता अभिनेता रजनीकांत आहे.