राखी सावंतला तिसऱ्यांदा मिळाला प्रेमात धोका, डोडी खाननेही लग्नाला दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:53 IST
1 / 10राखी सावंतने नुकतेच तिसरे लग्न करत असल्याचे जाहीर केले होते. ती म्हणाली होती की ती लवकरच पाकिस्तानची सून होणार आहे. 2 / 10लग्नानंतर तिने रिसेप्शन, हनिमून आणि आपले भावी आयुष्य कुठे व्यतीत करणार याची माहिती लोकांना दिली होती. पण लग्नाआधी पुन्हा एकदा बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनचे मन तुटले आहे. 3 / 10डोडी खानने राखीला प्रपोज केले होते आणि लग्नाबाबतही बोलले होते, पण आता तो स्वतःच आपल्या वचनावरून पलटी मारली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. म्हणजे पुन्हा एकदा राखीची प्रेमात फसवणूक झाली आहे.4 / 10पाकिस्तानच्या प्रेमात पडलेल्या राखी सावंतला कसं कळलं नाही की प्रेमाबद्दल गोड बोलणारा डोडी खान लग्नाआधीच आपला विश्वासघात करेल.5 / 10डोडीने सोशल मीडियावर राखीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण, अभिनेत्रीला प्रपोज केल्यानंतर काही दिवसांतच त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. 6 / 10डोडी खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डोडी म्हणतोय की, काही दिवसांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर माझा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये मी राखी सावंतला प्रपोज केले होते. ते अगदी बरोबर पाहिलंत... मी प्रपोज करण्याचे कारण म्हणजे मी तिला चांगले ओळखत होतो7 / 10जेव्हा मी तिला चांगला ओळखू लागलो तेव्हा मला तिच्यामध्ये एक अतिशय प्रेमळ व्यक्ती दिसली. तिने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तिने तिचे आई-वडील गमावले, त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या दुःखात ती त्यांच्यासोबत राहिली, जे आजच्या काळात जवळजवळ शक्य नाही.8 / 10ती व्यक्ती राखीच्या आयुष्यात आली. तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्यांनी तिच्यासोबत काय केले? ती खूप आघातातून बाहेर आली आहे. इस्लामचा स्वीकार केला, उमराह केला, फातिमा नाव ठेवले. माशाल्लाह... खूप मोठी गोष्ट आहे. मला ते इतके आवडले की मी प्रपोज केले.9 / 10डोडी खान पुढे म्हणाला, 'राखी, तू माझी चांगली मैत्रीण आहेस आणि नेहमीच राहशील. तुम्ही डोडी खानची वधू बनू शकला नाहीत, पण पाकिस्तानची वधू नक्कीच बनणार आहात. हे माझे तुला वचन आहे, मी तुझे लग्न माझ्याच एका भावासोबत करुन देईन... मग मी तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देईन.10 / 10राखी सावंतनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या भावना इमोजीद्वारे व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने रडणारे आणि हार्ट ब्रेकचे इमोजी शेअर केले आहेत.