स्पायडर वुमन!! राखीचा नवा ड्रामा, असा तिचा अवतार तुम्ही कधीच पाहिला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:47 IST
1 / 8राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही. राखी काय करेल याचा नेम नाही. तिचा हा नवा ड्रामा पाहून तुम्हीही हैराण व्हाल.2 / 8या फोटोत राखी स्पायडर वुमनच्या गेटअपमध्ये दिसतेय. अशा अवतारात तिला तुम्ही कधीही बघितले नसेल.3 / 8फोटो बघता, राखी कशाची तरी शूटींग करतेय असे दिसतेय. स्वत:ला ती स्पायडर वूमन असल्याचे सांगतेय.4 / 8विशेष म्हणजे, मला बिग बॉस ओटीटीमध्ये बोलवा,अशी विनंती ती करताना दिसत आहे.5 / 8मला बिग बॉसच्या घरात बोलवाल तर मी सर्वांना घरातून पळवून लावेल, असा अजब दावा करतेय.6 / 8पापाराझींसमोर राखीने स्पायडर वूमन बनून अनेक पोज दिल्या.7 / 8तिचे हे सर्व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.8 / 8सध्या राखी जिथे जाईल तिथे तिच्यामागे फोटोग्राफर असतात. यामुळे ती सतत चर्चेत असते. आता मात्र ती स्पायडर वुमन बनून चर्चेत आहे आणि हा स्पायडर वुमनचा ड्रामा काय, हेही लवकरच कळेल.