आदिलची गर्लफ्रेंड तनु चंदेल प्रेग्नेंट?; राखी सावंतचा आणखी एक धक्कादायक खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:35 IST
1 / 7बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिने पती आदिल खानवर मारहाण, फसवणूक यांसारखे गंभीर आरोप केले होते. राखीने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती आणि त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली.2 / 7आता राखीने आदिलबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तनु उर्फ निवेदिता चंदेल नावाच्या मुलीसोबत आदिल आपली फसवणूक करत असल्याचे राखी सावंतने सांगितले होते. आता त्याने निवेदिता चंदेल प्रेग्नंट असल्याचं तिचं म्हणणं आहे3 / 7आदिलची गर्लफ्रेंड तनु प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिचा पती म्हणजेच आदिल तनूशी लग्न करणार असल्याचे तिनं सांगितलं. तनुच्या प्रेग्नेंसीबद्दल ऐकून तिला धक्का बसल्याचेही राखी सावंतने सांगितले. आता राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.4 / 7राखी सावंतने पापाराझीशी बोलताना आदिलला जामीन मिळाला नसल्याचे सांगितले. म्हणाली, मी हैराण आहे, आधी लग्नाची बातमी आणि आता तनु चंदेल प्रेग्नेंट आहे. तेव्हा ते लग्न होणार होतं. 5 / 7तनुने बाहेर येऊन सांगावे की ती प्रेग्नेंट आहे की नाही. आदिलविरोधातील बलात्कार प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या मुंबई आणि म्हैसूर पोलिसांचे मला आभार मानायचे आहेत. हे सगळं खूप हैराण करणार आहे. 6 / 7राखी सावंतने पतीविरोधात एफआयआर दाखल करत अनेक आरोप केले आहेत. राखीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, आदिलने तिचे दागिने चोरले, पैसेही खाल्ले. राखीनेही तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरले. मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी आदिलला दहा लाखांचा चेक दिला होता, आईवर शस्त्रक्रिया करावी लागली, पण आदिलने ते पैसे आईच्या उपचारासाठी खर्च केले नाहीत, त्यामुळे आईचा मृत्यू झाला.7 / 7राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. सातत्याने नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. राखीने पती आदिल खान दुर्रानी याच्यावर मारहाण आणि फसवणुकीचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले. यानंतरही आदिल खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत आहे.