Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss मध्ये पहिल्यांदाच रोमॅंटिक झाला राखी सावंतचा पती, नॅशनल टीव्हीवरील लिपलॉकचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:14 IST

1 / 9
बिग बॉस सीझन १५ मध्ये राखी सावंत ड्रामा करून फॅन्सचं मन जिंकत आहे. यावेळी राखी सावंत शोमध्ये तिचा पती रितेशसोबत आली आहे. तसा तर रितेश राखीचा खरा पती आहे की नाही यावरून चर्चा सुरू आहे. असं असलं तरी फॅन्सना पहिल्यांदाच कपलची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसली.
2 / 9
जर तुम्ही बिग बॉस १५ चा ताजा एपिसोड पाहिला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. पहिल्यांदाच राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांच्या लवी-डवी मोमेंट्स बघायला मिळालेत.
3 / 9
राखीचा पती रितेशने सकाळी सकाळी बिग बॉसच्या हाऊसमध्ये रोमान्सचा तडका लावला. रितेशने घरातील सदस्यांसमोर राखी सावंतला लिप किस केलं. पतीचा रोमॅंटिक अंदाज पाहून राखी सावंत लाजली. राखीची ही रिअॅक्शन बघण्यासारखीच होती.
4 / 9
कालच्या एपिसोडमध्ये घरातील लोक गार्डनमध्ये बसले होते. तेव्हा राखी सावंत आणि तिच्या पतीला एकत्र बघून घरातील लोक किस किस किस असे ओरडू लागले. त्यानंतर जे घडलं त्याने सर्व बिग बॉस फॅनला सरप्राइज मिळालं.
5 / 9
राखी सावंत आणि तिचा पती रितेश जवळ जाते. त्यानंतर रितेशन राखीच्या ओठांवर किस केलं. हा नजारा पाहून घरातील लोक हूटींग करू लागले होते. नॅशनल टेलिव्हिजनवर पतीला किस केल्यानंतर राखी लाजून लाल झाली होती.
6 / 9
तेच रितेशनही ब्लश करताना दिसला. घरातील लोक राखी आणि रितेशला चिडवत होते. राखी आणि रितेशच्या या रोमॅंटिक मोमेंटवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. राखी आणि रितेशचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
7 / 9
राखी सावंत जेव्हापासून बीबी १५ मध्ये आली तेव्हापासून ती पतीकडे तक्रार करते की तिचा पती तिच्यापासून दूर राहतो. जवळ येत नाही. शोमध्ये जवळ येण्यास घाबरतो. म्हणतो घरातील लोक बघत आहेत.
8 / 9
पण शुक्रवारच्या एपिसोडमध्ये रितेशने घरातील लोकांसमोर न लाजता राखीवरील त्याचं प्रेम दाखवलं. राखी आणि रितेशच्या या रोमॅंटिक केमिस्ट्रीची चर्चा होत आहे.
9 / 9
राखीचा पती रितेश जेव्हापासून शोमध्ये आला तेव्हापासून त्याची चर्चा होत आहे. रितेशचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. ज्यात तो त्याच्या कथित पत्नी आणि मुलासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत रितेश हा राखीचा खोटा पती असल्याचं म्हणत आहे.
टॅग्स :बिग बॉसराखी सावंतसोशल व्हायरल