Join us  

19 वर्षांत 46 चित्रपट; OTT ने बदललं 'या' अभिनेत्रीचं नशीब; आता करते कोट्यवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 2:04 PM

1 / 12
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीला आज ओटीटी क्वीन म्हटलं जातं आणि ती 'नेटफ्लिक्सची फेव्हरेट गर्ल' आहे. चित्रपटसृष्टीतील ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिच्या दमदार अभिनयामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते.
2 / 12
आपल्या 19 वर्षांच्या करियरमध्ये तिने हिंदी, तमिळ, मराठी, मल्याळम, तेलगू, बंगाली आणि इंग्रजीसह 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे असंख्य चाहते असून तिच्या अदांवर ते फिदा होतात.
3 / 12
ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. कोरोना काळात राधिका ओटीटीकडे वळली होती आणि त्यानंतर ती काही वेळातच ओटीटीवर लोकप्रिय झाली. तिच्या भूमिकांची जोरदार चर्चा रंगली.
4 / 12
राधिका नेटफ्लिक्सच्या अनेक सीरिज आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. अशा परिस्थितीत चाहतेही तिला प्रेमाने 'नेटफ्लिक्सची फेव्हरेट गर्ल' म्हणतात. राधिका आपटे कोणत्याही शोमध्ये किंवा चित्रपटात असते तेव्हा चाहत्यांना खात्री असते की ती एका दमदार भूमिकेत दिसेल.
5 / 12
राधिका जवळपास पाच वर्षांपासून ओटीटी स्पेसमध्ये सक्रिय आहे आणि याच दरम्यान विविध जॉनरमधील सीरिजमध्ये काम करत आहे.
6 / 12
राधिकाने चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. काही वेळा तिने बोल्ड सीन देखील दिले आहेत.
7 / 12
राधिका आपटेच्या OTT जगातील सर्वाधिक लोकप्रिय शोमध्ये 'सेक्रेड गेम्स', 'घोउल', 'ओके कॉम्प्युटर', 'रात अकेली है', 'लस्ट स्टोरीज', 'मोनिका, ओह माय डार्लिंग' आणि 'मेड इन हेवन सीझन 2' यांचा समावेश आहे.
8 / 12
आज OTT प्लॅटफॉर्मच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत राधिका सामील झाली आहे. डीएनए रिपोर्टनुसार, ती प्रत्येक वेब शोसाठी 4 कोटी रुपये घेते.
9 / 12
राधिका आपटेने एका छोट्या भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 2009 मध्ये आलेला बंगाली चित्रपट 'अँथीन' हा तिचा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता.
10 / 12
राधिका आपटे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
11 / 12
12 / 12
टॅग्स :राधिका आपटेबॉलिवूड