Join us  

...तर 'समांतर'मध्ये स्वप्निलबरोबर रोमान्स करताना दिसली असती प्राजक्ता, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "सईमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 1:08 PM

1 / 11
प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे.
2 / 11
पण, लोकप्रिय असूनही प्राजक्तालाही अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं.
3 / 11
प्राजक्ताने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
4 / 11
या मुलाखतीत रिजेक्शनबद्दल बोलताना प्राजक्ताने 'समातंर २'साठी सिलेक्शन झाल्याचा खुलासा करत रिजेक्शनची खंतही व्यक्त केली.
5 / 11
'मला वाईट वाटलं होतं. 'समांतर २'मधील सईच्या भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. ती बोल्ड भूमिका होती.'
6 / 11
'त्यांना सात्विक गोड चेहरा असलेली अभिनेत्री हवी होती. ते कॅरेक्टरच असं होतं की ती साधी दिसणारी व्यक्ती नंतर बोल्ड निघते. माझ्या चेहऱ्याचा त्यांना तिथे तसा वापर केला होता.'
7 / 11
'माझं सिलेक्शनही झालं होतं. १५ दिवसांमध्ये काम सुरू होणार होतं. दोन दिवसांत कॉन्ट्रॅक्टवर सही होणार होती. कामाचे पैसेही ठरले होते. पण, मला फोनच येईना.'
8 / 11
'माझे फोनही उचलले जात नव्हते. त्यानंतर एका आठवड्याने मला कळलं की ती भूमिका सई करत आहे.'
9 / 11
'मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की तुला पूर्णवेळ तिकडे राहायला लागलं असतं. करोना होता, त्यामुळे हास्यजत्रेमुळे तुला जमलं नसतं. म्हणून तुला नाही घेतलं गेलं.'
10 / 11
'आणखी एक चित्रपट होता. त्यात ललितबरोबर मी काम करणार होते. नंतर मला कळलं की मी चित्रपटात काम करत नाहीये. एका महिन्यात या दोन्ही गोष्टी घडल्या.'
11 / 11
''समांतर'वेळी मला माहीत होतं की ते सईबरोबर जास्त कंम्फर्टेबल आहेत. त्यांची ती आधीची टीमच होती. आणि करोनाचाही फॅक्टर होता. पण, ठिके तरीही मी ते मान्य केलं.'
टॅग्स :प्राजक्ता माळीसई ताम्हणकरस्वप्निल जोशी