PICS : मलायका आधीची, मलायका आत्ताची..., फोटो पाहून क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:00 IST
1 / 10बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस. मलायका आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करतेय. पण या वयातही मलायका बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींना मात देते. 2 / 10म्हणायला मलायका 48 वर्षांची झालीय. पण वाढत्या वयासोबत जणू तिच्या सौंदर्यात वाढ होतेय. तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.3 / 10होय,या जुन्या फोटोत दिसणारी ही आत्ताची मलायका आहे, यावर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही.4 / 10गेल्या काही वर्षांत मलायकामध्ये बराच बदल झाला आहे. ती आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस झालीय. एक गोष्ट मात्र कायम आहे, तो म्हणजे, तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास.5 / 10मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे. अनेकदा ती स्वत:चे बिकीनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अनेकदा या फोटोंमुळे तिला ट्रोलही केले जाते. पण मलायका कधीच याची पर्वा करत नाही. मलायकाचा हाच बोल्ड अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.6 / 10लायका एक ट्रेंड डान्सर आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिने डान्स शिकायला सुरुवात केली. मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांची पहिली भेट एका कॉफीच्या जाहिरातीवेळी झाली. अर्थात 19 वर्षांनतर मलायकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 7 / 10अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडले गेले. आधी मलायकाने हे नाते जगापासून लपवले. पण अलीकडे मलायका आणि अर्जुनने दोघांनीही ते एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती.8 / 10 मलायका अर्जुनपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या वयातील फरकामुळेही त्यांना अनेकवेळा ट्रोल केले जाते. पण मलायकासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. 9 / 10मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात वीजे म्हणून केली होती. एमटीव्ही चॅनलसाठी ती काम करायची. मलायकाने मॉडेलिंगनंतर अल्बम आणि आयटम नंबरमधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिचे ‘छैंया छैंया’ हे गाणे आजही चाहत्यांच्या हिट लिस्टमध्ये आहे. 10 / 10मलायकाने आयटम नंबरशिवाय काही सिनेमांमध्ये कामही केले, पण तिला ओळख तिच्या डान्स नंबरमुळेच मिळाली.