Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोशूटमध्ये दिशा पटानीचा सेक्सी अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

By admin | Updated: July 1, 2017 13:01 IST

दिशाचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून फक्त 13 तासांत एक लाखाहून जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिशा पटानीने फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये दिशा पटानीचा सेक्सी अवतार दिसत आहे. मॅगझीनने इन्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवरदेखील दिशा पटानी ट्रेंडिंगमध्ये असून तिच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे. दिशा पटानीने आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. दिशा पटानीने महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारि "एम एस धोनी" आणि "कुंग फू योगा" चित्रपटात काम केलं आहे.  "कुंग फू योगा" चित्रपटात तिला अॅक्शन स्टार जॅकी चॅनसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 
 
दिशाचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून फक्त 13 तासांत एक लाखाहून जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 
 
 
 
दिशा पटानीने 2015 साली आलेल्या तेलगू चित्रपट "लोफर"मधून पदार्पण केलं होतं. एम एस धोनी हा तिचा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. 2016 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत मुख्य भुमिकेत होता. "कुंग फू योगा" चित्रपटाच्या माध्यमातून तर तिला लॉटरीच लागली होती. जॅकी चॅनसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. या चित्रपटात सोनू सुदही मुख्य भुमिकेत होता. 
 
 
दिशा पटानी याआधी टी-सीरिजच्या "बेफिक्रा" व्हिडीओमध्ये दिसली होती. तिचं आणि टायगर श्रॉफचं अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. सध्या ती "बागी 2" चित्रपटात काम करत आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. "बागी 2" हा 2016 मध्ये आलेल्या "बागी" चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. "बागी" चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.