Join us  

'बँकेतून माझे पैसे, वडिलोपार्जित दागिने काढले;' नुसरत जहाँ यांचे पती निखिल जैन यांच्यावर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 3:23 PM

1 / 10
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ(Nusrat Jahan) नेहमी चर्चेत राहणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. अभिनय क्षेत्रातील यशस्वी करिअर, निवडणूक निकाल आणि निखील जैन याच्याशी दुसऱ्या धर्मात केलेला विवाहामुळे नुसरत जहाँ कायम चर्चेत राहिल्या.
2 / 10
पण आता नुसरत जहाँ भलत्याच एका कारणामुळं चर्चेत आहे. काही रिपोर्टसच्या दाव्यानुसार नुसरत जहाँ या ६ महिन्याची गर्भवती (Nusrat Jahan Pregnant) आहेत आणि त्यांचे पती निखील जैन(Nikhil Jain) यांना त्या गर्भवती असल्याची माहितीच नाही.
3 / 10
दरम्यान, या सर्व वादानंतर त्यांनी एक स्टेटमेंट जारी करत आपला विवाह आणि त्यानंतर आपल्या बँक खात्यात करण्यात आलेल्या छे़डछाडीबद्दल खुलासा केला आहे. निखिल जैन यांनी त्यांच्या माहितीशिवाय खात्यातून पैसे काढल्याचा आरोप नुसरत जहाँ यांनी केला आहे.
4 / 10
'जी व्यक्ती स्वत:ला श्रीमंत म्हणवते आणि मी त्याचा वापर केल्याचं म्हणते तो रात्रीअपरात्री कोणत्याही वेळी गैर-कायदेशीररित्या माझ्या खात्यातून पैसे काढून घेतो. आम्ही वेगळे राहत असल्यानंतरही ही सुरूच आहे. मी बँकिंग अथॉरिटीला यापूर्वीच सांगितलं होतं आणि लवकरच पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली जाईल,' असं नुसरत जहाँ म्हणाल्या.
5 / 10
यापूर्वीही त्यांच्या आग्रहाखातर माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या बँक खात्याचे डिटेल्स त्यांना देण्यात आले होते परंतु त्यानंतर बँकेला आमच्या बॅक खात्यांबद्दस देण्यात आलेल्या निर्देशांची ना मला आणि माझ्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. माझ्या माहितीशिवायच निराळ्या खात्यात पैशांचा चुकीचा वापर सुरू होता. सध्या बँकेशी यासंदर्भात बोलणीही सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.
6 / 10
'माझं जे काही होतं, माझे, कपडे, बॅग, अॅक्सेसरीज ते सर्व त्यांच्याकडेच आहे. माझे वडिलोपार्जित दागिने, जे मला माझ्या कुटुंबीयांनी, नातेवाईंकांनी दिले होते, माझ्या मेहनीच्या कमाईतून जे काही घेतलं होतं, तेदेखील त्यांच्याकडेच आहे,' असं नुसरत जहाँ म्हणाल्या.
7 / 10
'मी कधीही आपलं वैयक्तिक जीवन किंवा ज्याच्याशी निगडीत नाही अशा व्यक्तीच्या बद्दल बोलणार नाही. यासाठीच जे स्वत:ला सामान्य व्यक्ती म्हणतात, त्यांना या सर्व गोष्टींनी स्वत:चं मनोरंजन करून घेऊ नये ज्याच्याशी ते जोडले गेलेले नाहीत,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
8 / 10
आता नुसरत जहाँ यांनी आपल्या विवाहावर पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक Interfaith Marriage (दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह) असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही, असंही त्या म्हणाल्या.
9 / 10
आम्ही खूप आधीच वेगळे झालो होते. मात्र मी याबाबत बोलले नव्हते. कारण मी माझ्या खासगी आयुष्याला माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवू इच्छित होते. आमचे कथित लग्न कायदेशीररीत्या वैध आणि मान्य नाही आहे. कायद्याच्या नजरेत ते लग्न अजिबात वैध नाही, असंही त्यांनी नमूद केलं होतं.
10 / 10
नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. तसेच निखिल जैन यांनी या प्रकरणात खटलासुद्धा दाखल केला आहे. नुसरत या माझ्यासोबत नाही तर कुणा अन्य व्यक्तीसोबत राहू इच्छित आहेत, असा दावा निखिल जैन यांनी केला आहे.
टॅग्स :नुसरत जहाँलग्नआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसखासदार