Join us  

Sai Tamhankar: मराठमोळ्या सईची हॉट अदा, हिरवेगार फोटो पाहून नेटीझन्स फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 2:19 PM

1 / 10
मराठीमोळी हॉट आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर आता ती अनेक हिंदी चित्रपटात झळकली आहे. विशेष म्हणजे आयफा अवॉर्डसाठी सहायक अभिनेत्री म्हणूनही तिचं नामांकन झालं होतं.
2 / 10
आपल्या अभिनयासह बिनधास्तपणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सईचा ड्रेसिंग स्टाईल आणि हॉट अदा चाहत्यांना भुरळ घालतात. सोशल मीडियावरही ती कायम सक्रीय असते.
3 / 10
फिल्मफेअरने सईचे काही फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यामध्ये, ती हिरव्या ड्रेसमध्ये हॉट अदांनी फोटोशूट करत असल्याचे दिसून येते. तिनेही इंस्टा अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
हिरव्या ड्रेसमधील सईचे फोटो तिच्या चाहत्यांनीही चांगलेच आवडले असून चाहते हे फोटो पाहून अनेक कमेंट करत आहेत. हिरव्या मिर्चीसारखी चमक सईच्या ड्रेसवर दिसून येते. तर, सईनेही स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
5 / 10
सईने काही दिवसांपूर्वी गोल्डन गर्ल बनून फोटोशूट केले होते. त्यातही ती एकदम हटके लूकमध्ये स्टाईलिश दिसत आहे. त्यात, गोल्डन पडदा आणि ड्रेसमध्ये ती दिसते आहे.
6 / 10
मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित 'लॉकडाऊन' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसह श्वेता बसु प्रसाद, आहाना कुमरा, प्रतीक बब्बर आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर हृषिता भट कॅमिओमध्ये दिसणार आहे.
7 / 10
सई ताम्हणकर फूलमती नावाच्या स्थलांतरित कामगारांच्या भूमिकेत आहे. कोविड साथीमुळे त्यांचे उपजीविकेचे मार्ग बंद पडून उपासमार सुरू होते आणि रेल्वेगाड्या व स्थानिक वाहतूक बंद असल्यामुळे त्यांना आपल्या गावी चालत जाणे भाग पडते, असा तिचा प्रवास आहे.
8 / 10
इफ्फीच्या निमित्ताने सई सध्या गोव्यात आहे. त्याच कार्यक्रमातील तिचे हे फोटोशूट आहे. गोवा हे माझे सर्वांत आवडते ठिकाण आहे. मी येथे कित्येक वर्षांपासून येत आहे. हे ठिकाण असे आहे की, कामानिमित्त आलो तरी सुट्टी घालवायला आलो आहोत, असेच नेहमी वाटंत.
9 / 10
येथील संस्कृती, पारंपरिक खाद्यपदार्थ हे खरंच मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता देऊन जातात, येथील लोकही खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत, असे सई ताम्हणकरने ‘लोकमत’शी बोलताना म्हटले.
10 / 10
मी इफ्फी महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते. यंदा ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट घेऊन मी इफ्फीत दाखल झाली आहे, त्यामुळे अधिक आनंद होत आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ हे चित्रपटाचे नाव असले तरी, खऱ्या अर्थाने लॉकडाऊनसारखे जास्त काही नाही,
टॅग्स :सई ताम्हणकरगोवाबॉलिवूडसिनेमा