Join us

IN PICS : राहुल देवसोबत 9 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! या कारणानं अद्याप केलं नाही लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:25 IST

1 / 10
कंगना राणौत, प्रियंका चोप्राच्या ‘फॅशन’ या चित्रपटातून अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवणारी अभिनेत्री मुग्धा गोडसे अनेक चित्रपटांत झळकली. आज याच मुग्धाचा वाढदिवस.
2 / 10
मुग्धाच्या आयुष्य चढऊतारांनी भरलेलं राहिलं. एकेकाळी ती पेट्रोलपंपावर काम करायची. दिवसाला 100 रूपये कमवायची. यानंतर ती मॉडेलिंगमध्ये आली आणि पाठोपाठ अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत.
3 / 10
मुग्धाने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर मुग्धाला बऱ्याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आणि यानंतर जणू तिचं आयुष्यच बदललं.
4 / 10
मुग्धाच्या आयुष्यात पुन्हा असच एक अनपेक्षित वळण आलं. होय, स्वत:पेक्षा 14 वर्षांनी मोठ्या राहुल देवसोबत तिची भेट झाली आणि तिचं जग बदललं.
5 / 10
मुग्धा तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत असते. तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेला अभिनेता राहुल देवला ती डेट करते आहे.
6 / 10
मुग्धा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता राहुल देवला डेट करतेय. दोघंही लिव्ह इनमध्ये राहतात. पण दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 10
मुग्धा व राहुलची पहिली भेट 2013 साली एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. इथून मैत्री झाली आणि पुढे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
8 / 10
राहुल मुग्धापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. पण वयातील हे अंतर त्यांच्या प्रेमाआड कधीच आलं नाही. मुग्धा आयुष्यात येण्याआधी राहुलचे लग्न रिनाशी झालं होतं. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण 2009 मध्ये रिनाचे कर्करोगाने निधन झालं. रिनाच्या निधनानंतर काहीच वर्षांनी मुग्धा त्याच्या आयुष्यात आली.
9 / 10
2015 साली राहुल व मुग्धाने आपल्या नात्यावी कबुली दिली. तेव्हापासून ते लिव्ह इनमध्ये राहतात. पण दोघंही लग्न करू इच्छित नाही.
10 / 10
दोन व्यक्ती एकमेकांसोबत आनंदी आहेत तर मग लग्न करण्याची गरज काय? लग्नाने काहीही फरक पडत नाही, असं दोघांचंही मत आहे. मुग्धाने 2008 मध्ये मधुर भंडारकरच्या फॅशन या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने ऑल द बेस्ट, हेल्प, जेल, हिरोईन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
टॅग्स :मुग्धा गोडसेराहुल देव