Join us  

PHOTOS : निळ्याशार समुद्रात मौनी रॉयने दिल्या हॉट पोझ, शेअर केले मालदीव व्हॅकेशनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 5:16 PM

1 / 9
‘ब्रह्मास्त्र’च्या यशाने सुखावलेली मौनी रॉय सध्या कुठे आहे तर सुट्टीचा आनंद घेते आहे. होय, पती सूरज नांबियारसोबत मौनी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.
2 / 9
मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो मौनीने शेअर केले आहेत. समुद्रातील मौनीचे हे हॉट फोटो पाहून फॅन्सही क्रेझी झाले आहेत.
3 / 9
मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिचे बोल्ड फोटो चर्चेत आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4 / 9
या फोटोंमध्ये मौनी निळ्याशार समुद्राच्या पाण्यात आराम करताना दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये ती समुद्रात लावलेल्या झोपाळ्यात एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे.
5 / 9
फोटोंमध्ये तिने गडद रंगाचा वन पीस परिधान केला आहे. हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने तिचे केस खुले सोडले आहेत. हा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे.
6 / 9
एकापेक्षा एक पोझ देणा-या मौनीचे हे फोटो तूर्तास तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंसोबत मौनीने एक संदेशही दिला आहे.
7 / 9
मौनीच्या या फोटोंना चारच तासांत 3 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. कमेंट्सचाही पूर आला आहे.
8 / 9
मौनीचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. यात मौनीचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. चित्रपटाने तेवढीच दमदार कमाई केलेली पाहून मौनी खुश्श आहे.
9 / 9
मौनी रॉयने यावर्षी जानेवारीत सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली होती. गोव्यात हा लग्न सोहळा पार पडला होता. आधी दोघांनीमल्याळी रितीरिवाजांनुसार आणि नंतर बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं होतं.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूडब्रह्मास्त्र