Join us  

PHOTOS : प्रेग्नंट आलिया भट प्रमोशनमध्ये बिझी, पिंक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 4:42 PM

1 / 10
आलिया भट सध्या प्रेग्नंट आहे. लवकरच ती आई होणार आहे. पण सोबत ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचं प्रमोशनही सुरू आहे.
2 / 10
‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती पहिल्यांदा पती रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये आलिया बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली.
3 / 10
या फोटोत आलियासोबत रणबीर कपूरही आहे. आईबाबा होणार असल्याचा आनंद दोघांच्याही चेह-यावर ओसंडून वाहतोय.
4 / 10
या फोटोत आलियाच्या चेह-यावरचा प्रेग्नंसी ग्लो सुद्धा स्पष्ट दिसतोय. आलियाने याचे काही फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवरही शेअर केले आहेत.
5 / 10
या फोटोत आलिया पिंक ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये दिसतेय. सोबत तिने हाफ ब्लेजरही कॅरी केलं आहे. आलियाच्या या फोटोंवर फॅन्स फिदा झाले आहेत.
6 / 10
काही चाहत्यांनी हे फोटो पाहून आलियाचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला सल्लाही दिला आहे. प्रेग्नंसीमध्ये हिल्स घालणं बंद कर,असं अनेक युजर्सनी तिला म्हटलं आहे.
7 / 10
आलिया लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. अशात तिने एक मोठा निर्णयही घेतला आहे. होय, आलिया लवकरच तिच्या नावात बदल करणार आहे.
8 / 10
होय, आलिया आता आलिया भट नाही तर आलिया भट कपूर या नावानं ओळखली जाणार आहे. पासपोर्टवरही तिचं हेच नाव असणार आहे.
9 / 10
आलियाने याचवर्षी 14 एप्रिलला रणबीरसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर काहीच महिन्यांनी तिनं प्रेग्नंसीची घोषणा केली होती.
10 / 10
आलिया व रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा येत्या 9 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. अयान मुखर्जीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरब्रह्मास्त्रबॉलिवूड