Join us  

'मोहब्बतें'मधून रातोरात स्टार बनली प्रिती, शाहरुख-अक्षयसोबत केलं काम, आता जगतंय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 6:13 PM

1 / 8
'मोहब्बते' सिनेमात जिमी शेरगिलसोबत दिसलेली अभिनेत्री प्रीती झांगियानी आज ४० वर्षांची झाली. १८ ऑगस्ट १९८० ला ती मुंबईतील एक सिंधी परिवारात जन्माला आली. प्रीतीने सर्वांचं लक्ष सर्वातआधी वेधून घेतलं ते राजश्री प्रॉडक्शनच्या 'ये है प्रेम' अल्बममधून. (फोटो इन्स्टाग्नाम)
2 / 8
प्रीतीने २००० मध्ये आलेल्या 'मोहब्बतें' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर प्रीती २००२ मध्ये 'आवारा पागल दिवाना' आणि 'वाह तेरा क्या कहना' या सिनेमात दिसली होती. (फोटो इन्स्टाग्नाम)
3 / 8
प्रीती झांगियानी जितक्या वेगाने प्रगती करत गेली तितकी तिची लोकप्रियता कमी होत गेली. तिचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. (फोटो इन्स्टाग्नाम)
4 / 8
नंतर प्रीती २००५ मध्ये आलेल्या 'चाहत:एक नशा' या सिनेमात अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले होते. यात तिच्यासोबत अभिनेता आर्यन वैद्य होता. बोल्ड सीन्सचा भडीमार असूनही या सिनेमालं फारसं यश मिळालं नव्हतं. (फोटो इन्स्टाग्नाम)
5 / 8
अभिनयाच्या दुनियेत राहण्यासाठी प्रीती झांगियानीने , तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी, उर्दू आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, मात्र त्याला कुठेही यश मिळाले नाही. (फोटो इन्स्टाग्नाम)
6 / 8
2008 मध्ये तिने अभिनेता प्रवीण डबाससोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि चित्रपटांपासून दूर गेली. (फोटो इन्स्टाग्नाम)
7 / 8
प्रवीण डबास हा स्वत:ही अभिनेता आहे. तो चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. पण त्याच वेळी ते पंजा लढवण्याची स्पर्धाही आयोजित करतात. यात प्रीती त्याला साथ देते.(फोटो इन्स्टाग्नाम)
8 / 8
प्रीती झांगियन आपल्या पतीसह देशभरात विविध ठिकाणी पंजांच्या स्पर्धा घेतात आणि खेळ म्हणून त्याचा प्रचार करत आहेत. (फोटो इन्स्टाग्नाम)
टॅग्स :प्रिती झंगियानीसेलिब्रिटी