Join us  

कचऱ्यात सापडलेल्या मुलीचं पालटलं नशीब; मिथुन चक्रवर्तीची दत्तक लेक आज करतीये अभिनेत्रींवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 7:00 AM

1 / 9
कलाविश्वात बऱ्याचदा सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची चर्चा रंगत असते.
2 / 9
यावेळी अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे.
3 / 9
मिथुन चक्रवर्ती यांनी चार मुलं आहे. यात तीन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव दिशानी चक्रवर्ती असून सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
4 / 9
दिशानी ही मिथुन यांची सख्खी मुलगी नसून तिला दत्तक घेण्यात आलं आहे.
5 / 9
दिशानीचा जन्म झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलं होतं. या कचऱ्यातून मिथुन यांनी तिला उचललं आणि एका एनजीओमध्ये नेलं. त्यानंतर तेथून त्यांनी कायदेशीररित्या तिला दत्तक घेतल्याचं सांगण्यात येतं.
6 / 9
मिथुन यांनी त्यांच्या मुलांमध्ये आणि तिच्यात कधीच भेदभाव केला नाही. अगदी आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला.
7 / 9
दिशानी आता मोठी झाली असून प्रचंड ग्लॅमरस जीवन जगते.
8 / 9
दिशानी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
9 / 9
दिशानीला अभिनयाची विशेष आवड असल्याचं सांगण्यात येतं. तसंच ती सलमान खानची मोठी फॅनदेखील आहे.
टॅग्स :मिथुन चक्रवर्तीसेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खान