PHOTOS: ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’चा किताब जिंकणारी मानसा वाराणसी, हिच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 12:52 IST
1 / 10तेलंगणाची मानसा वाराणसी 2020 ची ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ बनली आहे. ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब जिंकणारी मानसा केवळ 23 वर्षांची आहे.2 / 10 हरियाणाची मणिका शोकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह यांना पछाडत मानसाने ‘‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020’ ’चा मुकूट आपल्या नावावर केला.3 / 10 मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे.4 / 10बुधवारी रात्री मुंबईच्या हयात रिजेंसी हॉटेलमध्ये ‘मिस इंडिया 2020’चा फिनाले रंगला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा पूर्णपणे डिजिटल रूपात पार पडली.5 / 10 ‘मिस इंडिया चर्ल्ड 2020’च्या किताबावर नाव कोरणारी मानसा वाराणसी ही तेलंगणाची आहे.6 / 10 हैदराबादेत राहणा-या मानसाने याआधी ‘मिस तेलंगणा’ हा किताब जिंकला होता. 7 / 10मानसा ही इंजिनिअर आहे. वसवी कॉलेजातून तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.8 / 10 पेशाने ती फायनान्शिअल एक्सचेंज इन्फॉर्मेशन अॅनालिस्ट आहे. 9 / 10वाचन, गाणी ऐकणे, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत. 10 / 10कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणा-या मानसाने 8 वर्षे भरतनाट्यम शिकले आहे. चार वर्षे संगीताचे धडे गिरवले आहेत.