1 / 9अभिनेत्री मुक्ता बर्वे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे.2 / 9मुक्ताने अभिनय कौशल्यावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे.3 / 9मुक्ता बर्वे ४६ वर्षांची असून ती अद्याप अविवाहित आहे. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नावर भाष्य केले.4 / 9लग्नाबद्दल एका मुलाखतीत मुक्ताने सांगितले होते की, खरंतर हा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे असा प्रश्न कोणीही कोणालाही विचारु नये. 5 / 9ती पुढे म्हणाली की, मी आता जितकी सुखी आणि समाधानी आहे. त्याहून जास्त सुख मिळेल, असे वाटेल तेव्हाच मी लग्न करेन.6 / 9एकेकाळी मुक्ताचे दिग्दर्शक सतीश राजवाडेवर क्रश होते. याबद्दल तिने नंबर वन यारी विथ स्वप्निल जोशीच्या शोमध्ये खुलासा केला होता. 7 / 9ती म्हणाली होती की, सतीशच्या व्यक्तिमत्तावर आम्ही अनेक जणी भारावून गेलो होतो. त्याचा वावर, त्याची शैली, सगळंच प्रभावी वाटायचं. त्याला पाहून आम्ही नाटकांमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ लागलो होतो.8 / 9मात्र नंतर समजलं की, त्याचं लग्न झालंय. तेव्हा जरा हिरमोड झाला. पण आमची मैत्री तितकीच चांगली आहे, असे मुक्ताने सांगितले.9 / 9मुक्ताने सतीश राजवाडे सोबत मुंबई पुणे मुंबई सिनेमाच्या तीन भागात काम केले आहे. याशिवाय एक डाव धोबीपछाड, रुद्रम या सिनेमातही काम केलंय.