Join us  

अशोक सराफ यांची ही नायिका सध्या काय करते? मराठी सिनेइंडस्ट्रीतून अचानक झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:31 AM

1 / 8
मराठी सिनेइंडस्ट्रीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या सिनेमांनी एक काळ खूप गाजवला. ही कलाकार मंडळी सातत्याने चर्चेतदेखील येत असतात. मात्र या कलाकारांसोबत झळकलेल्या काही अभिनेत्री प्रसिद्धीझोतापासून दूर राहिल्या. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रेखा राव (Rekha Rao).
2 / 8
८०-९०च्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री रेखा राव (Rekha Rao) यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान आणि धरलं तर चावतंय अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
3 / 8
अमराठी असून देखील त्यांनी कलाविश्वात नायिका म्हणून आपल्या अभिनयाचा पाय रोवला होता. मात्र ही अभिनेत्री आता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्रीला ओळखणंदेखील कठीण झाले आहे.
4 / 8
रेखा राव या मूळच्या बंगलोरच्या आहेत. त्या लहानाच्या मोठ्या तिथेच झाल्या. शाळेत असल्यापासूनच त्यांना नृत्याची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
5 / 8
राज कपूर सारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेखा राव यांनी नृत्याची कला सादर केली होती. पुढे ‘अथेगे थक्क सोसे’ नावाच्या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. कन्नड चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्या मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळल्या.
6 / 8
धरलं तर चावतय, शुभमंगल सावधान, अनपेक्षित, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, ईना मीना डिका, अशा बहुतेक चित्रपटातून त्यांनी अशोक सराफ यांची नायिका बनून प्रेक्षकांची पसंती मिळवली. मराठी चित्रपटांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटामधून सहाय्यक भूमिका केल्या. तेहजीब, हम दिलं दे चुके सनम ता चित्रपटानंतर त्यांनी सर्व मंगल मंगलाये, शुभ विवाह या कन्नड मालिका गाजवल्या.
7 / 8
रेखा राव या गेल्या अनेक वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या सध्या बंगलोरला स्थायिक झाल्या आहेत. बंगलोरला गेल्यावर त्यांनी कन्नड चित्रपट आणि मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. यासोबतच त्या अम्माज किचन राव या नावाने मेस चालवतात. कॉलेजच्या मुलांची, वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी सुरू केलेल्या घरगुती जेवणाला चांगली मागणी मिळत आहे.
8 / 8
यासोबतच रेखा राव यांनी आता अभिनयाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. हिंदी ,मराठी भाषेसह कन्नड आणि इंग्रजी भाषेतून सुद्धा ते हे कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत. प्रत्यक्षात आणि ऑनलाइन द्वारे त्यांनी हे क्लासेस सुरू केल्याने अनेक नवख्या कलाकारांना त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेता येणार आहेत.
टॅग्स :अशोक सराफ