Join us  

पतीपासून विभक्त झाल्यात 'या' 5 मराठी अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून एन्जॉय करतायेत सिंगल लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 8:00 AM

1 / 10
स्मिता गोंदकर - बिग बॉस मराठी सीझन १ ची स्पर्धक स्मिता गोंदकर हिचादेखील घटस्फोट झाला आहे. स्मिताने सिद्धार्थ बांठिया याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, सिद्धार्थने आपली फसवणूक करुन लग्न केल्याचा आरोप स्मिताने केला.
2 / 10
स्मिताने सिद्धार्थवर गैरवर्तन आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्याच्यापासून विभक्त झाली. स्मिता सध्या सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे.
3 / 10
शाल्मली टोळे - शाल्मली मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने २०१० मध्ये अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ मध्ये ते विभक्त झाले.
4 / 10
घटस्फोटानंतर शाल्मलीने पुन्हा लग्नाचा विचार केला नाही. तर, पियुषने मात्र दुसरं लग्न केलं.
5 / 10
तेजश्री प्रधान- होणार सून मी या घरची या मालिकेतून नावारुपाला आलेली तेजश्री आज कोणालाही नवीन नाही. तेजश्रीने याच मालिकेतील शशांक केतकरसोबत लग्नगाठ बांधली.
6 / 10
तेजश्री आणि शशांक यांचा संसार केवळ वर्षभर टिकला. त्यानंतर या दोघांमध्ये खटके उडू लागले. अखेर हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर शशांकने दुसरं लग्न केलं. मात्र, तेजश्री अजूनही सिंगल आहे.
7 / 10
मयुरी वाघ - अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत घटस्फोट घेतल्यानंतर पियुष रानडेने मयुरी वाघसोबत लग्न केलं. अस्मिता मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुषचं सूत जुळलं.
8 / 10
मैत्रीपासून सुरु झालेला हा प्रवास लग्नापर्यंत येऊन थांबला. या दोघांनी लग्न केलं. मात्र, पियुषचं मयुरीसोबतदेखील बिनसलं. अखेर मयुरीनेदेखील पियुषसोबत विभक्त होण्याच निर्णय घेतला.
9 / 10
तेजस्विनी पंडित - मराठी कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत तेजस्विनी पंडितचा आवर्जुन समावेश केला जातो. मध्यंतरी तेजस्विनी रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती.
10 / 10
तेजस्विनीने तिच्या बालपणीचा मित्र भूषण भोपे याच्याशी लग्न केलं होतं. मात्र हा संसार फार काळ टिकला नाही. तेजस्विनीला तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं बोलायला आवडत नाही.
टॅग्स :सेलिब्रिटीतेजश्री प्रधान तेजस्विनी पंडितटेलिव्हिजनसिनेमा