Join us  

रवींद्र महाजनींनी बिग बींसोबत हिंदीतून केली होती करिअरची सुरुवात; असे बनले मराठी सिनेमाचे 'विनोद खन्ना'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 4:54 PM

1 / 8
मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झाले. 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
2 / 8
१४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली.
3 / 8
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही कळलेलं नाही. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर याचं नक्की कारण कळेल.
4 / 8
रवींद्र महाजनींनी आपल्या करिअरची सुरुवात सात हिंदुस्तानी मधून केली होती हे फार कमी जणांना माहिती आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती तर रवींद्र महाजनी यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते मराठी सिनेसृष्टीत आले.
5 / 8
रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चं दशक गाजवलं. मराठी सिनेसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. देवता, ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.
6 / 8
महाजनी यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे वडील ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. बालपण मुंबईत. अभिनयाची आवड. लहानपणापासून. नाटकात-चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम. खालसा महाविद्यालयामध्ये बी.ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
7 / 8
‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. . सन १९९० नंतर चरित्र भूमिकां, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या.
8 / 8
रवींद्र महाजनी यांना मराठीतील राजेश खन्ना म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीस सून आणि नातू असा परिवार आहे.
टॅग्स :रवींद्र महाजनीगश्मिर महाजनी