Join us  

PHOTOS: अभिज्ञा भावे आणि मेहुल पैच्या लग्न सोहळ्यातील खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 2:47 PM

1 / 11
अभिनेत्री अभिज्ञा भावे ही तिचा बॉयफ्रेंड मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2 / 11
त्यांच्या लग्नाचे फोटो अभिज्ञाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
3 / 11
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.
4 / 11
अभिज्ञाने लग्नात लॅवेंडर रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिचा हा हटके लूक फारच जबरदस्त दिसत आहे.
5 / 11
अभिज्ञा स्वत: डिझायनर असल्याने तिचा लग्नातील लूक कसा असणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती.
6 / 11
मेहूलने देखील अभिज्ञाला मॅचिंग लॅवेंडर रंगाचीच शेरवाणी घातली होती.
7 / 11
मेहुल हा मूळचा मुंबईचा आहे.
8 / 11
अभिज्ञा व मेहूलचा ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा झाला होता.
9 / 11
गेल्या काही दिवसांपासून अभिज्ञा केळवणाचे फोटो देखील शेअर करत होती.
10 / 11
त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
11 / 11
या लग्न सोहळ्याला सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
टॅग्स :अभिज्ञा भावे