Join us  

मराठमोळी ही अभिनेत्री आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब, सध्या करतेय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 8:00 AM

1 / 14
२०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी मोघे हिने पदार्पण केलं. 
2 / 14
या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही. 
3 / 14
मात्र सध्या ती मॉडेलिंग करत असल्याचं समजतंय आणि तेही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून.
4 / 14
मानसी सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे वेगवेगळ्या अदांमधील फोटो पहायला मिळतात.
5 / 14
नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 14
फॅशनच्या जगात महत्त्वाचा समजला जाणारा मिस दिवा २०१३चा किताब मानसी मोघेने मिळवला.
7 / 14
तसेच मानसीनं रशियात पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारातचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत ती टॉप १०मध्ये होती.
8 / 14
मानसीनं २०१५ साली अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केलं. ती बुगडी माझी सांडली गं या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती.
9 / 14
तिच्यासोबत अभिनेता कश्यप परूळेकर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट लावणीप्रधान होता आणि या चित्रपटात तिने सात लावण्या केल्या होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही.
10 / 14
त्यानंतर २०१६ साली ऑटोग्राफ चित्रपटातही ती झळकली होती.
11 / 14
गेल्या दोन वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे.
12 / 14
मात्र सध्या ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
13 / 14
14 / 14
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोशूट व मॉडेलिंगचे फोटो पहायला मिळत आहेत.
टॅग्स :मानसी मोघे