Join us  

'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 1:01 PM

1 / 10
मराठी कलाविश्वात आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यातलाच एक चित्रपट म्हणजे शाळा.
2 / 10
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये घेऊन जाणारा हा चित्रपट विशेष गाजला.
3 / 10
या चित्रपटात अभिनेत्री, गायिका केतकी माटेगांवकर आणि अंशुमन जोशी याने मुख्य भूमिका साकारली होती.
4 / 10
या चित्रपटानंतर केतकी बऱ्याच प्रोजेक्टमुळे चर्चेत आली. मात्र, अंशुमन फारसा कुठे दिसला नाही. त्यामुळे हा अभिनेता कुठे आहे, काय करतो असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
5 / 10
अंशुमन जोशी याने शाळा चित्रपटात मुकुंद ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो विशेष लोकप्रिय झाला.
6 / 10
अंशुमन आता चांगलाच मोठा झाला असून आता तो हॅण्डसम दिसत असल्याचं पाहायला मिळतं.
7 / 10
अंशुमन सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही. त्यामुळे तो चाहत्यांच्याही संपर्कात फार कमी असतो.
8 / 10
अंशुमन मूळचा सोलापूरचा असून सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचं म्हटलं जातं.
9 / 10
शाळानंतर अंशुमन काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकला. यात ‘म्हैस'(२०१२), ‘फुंतरू'(२०१६), ‘फास्टर फेणे'(२०१७) या चित्रपटांचा समावेश आहे.
10 / 10
‘शाळा’नंतर अंशुमन ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसला. तसंच त्याने कारवां चित्रपटातही काम केलं आहे.
टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीकेतकी माटेगावकर