Join us  

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनायाचा बोल्ड अंदाज; अभिनेत्रीच्या अदांवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 4:21 PM

1 / 7
छोट्या पडद्यावरी 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनील चाहत्यांच्या समोर आली. त्यात तिने शनाया हे निगेटिव्ह पात्रं साकारलं होतं.
2 / 7
या मालिकेत हटके भूमिका साकारत तिने चाहत्यांची मने जिंकली. छोट्या पडद्यावरील ‘शनाया’ ते मोठ्या पडद्यावर विविधांगी भूमिकांनी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
3 / 7
मराठी सिनेसृष्टीची 'बबली गर्ल' म्हणून या अभिनेत्रीची ख्याती आहे. यापूर्वी रसिकाने वेगववेगळ्या प्रोजेक्ट्स मधून कामं केली. मात्र तिला या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. त्यातून रसिकाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.
4 / 7
नुकतंच अभिनेत्रीने काही फोटोज चाहत्यांसोबत शेअर केलेत. रसिकाच्या या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
5 / 7
रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नवीन प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते.
6 / 7
रसिकाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फकाट, गर्लफ्रेंड, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये ती झळकली.
7 / 7
आज रसिका सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरी चाहते आजही तिच्यावर भरभरून प्रेम करतात.
टॅग्स :रसिका सुनिलटेलिव्हिजन