Join us  

Golden Beauty! वेस्टर्न ड्रेसमध्ये सई ताम्हणकरने केलं बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 7:04 PM

1 / 8
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
2 / 8
छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी सई आता मोठ्या पडद्यावर चांगलीच रुळली आहे.
3 / 8
स्वबळावर कलाविश्वात नाव कमावणाऱ्या सईने मराठीसोबतच ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ या सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4 / 8
आज हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वात सईचा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच सई या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते.
5 / 8
सई सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा ती तिचे काही फोटोशूटमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 8
अलिकडेच सईने एक फोटोशूट केलं असून त्यात ती प्रचंड ग्लॅमरस रुपात दिसून येत आहे.
7 / 8
सईने गोल्डन रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
8 / 8
सईने प्रत्येक फोटोसाठी वेगवेगळी पोझ दिली आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसिनेमा