Join us  

कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 3:17 PM

1 / 8
रांगडा स्वभाव, जबरदस्त अभिनयशैली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये.
2 / 8
जोगवा, मुळशी पॅटर्न, सावरखेड एक गाव, कोकणस्थ अशा कितीतरी चित्रपटांमध्ये उपेंद्र झळकला आहे.
3 / 8
मराठी कलाविश्वाप्रमाणेच त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
4 / 8
उपेंद्रचा कलाविश्वात जरी सक्रीय वावर असला तरीदेखील सोशल मीडियावर तो फारसा सक्रीय नाही.
5 / 8
उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.
6 / 8
उपेंद्र लिमयेचं लग्न झालं असून त्याला भैरवी आणि वेद अशी दोन मुलं देखील आहेत.
7 / 8
उपेंद्रच्या पत्नीचं नाव स्वाती लिमये आहे.
8 / 8
स्वाती कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, ती समाजसेवेसाठी काम करते. स्वाती एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे.
टॅग्स :उपेंद्र लिमये सिनेमासेलिब्रिटी