Join us  

कलाविश्वापासून दूर आहे सचिन खेडेकरची पत्नी; 'या' क्षेत्रात करतीये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:54 PM

1 / 12
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणजे सचिन खेडेकर.
2 / 12
अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सचिन खेडेकर यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे.
3 / 12
सध्या सचिन खेडेकर कोण होणार करोडपती या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येत आहेत.
4 / 12
'मी शिवाजीराजे भोसले' बोलतोय या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळवलेला हा अभिनेता सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे.
5 / 12
अनेकदा प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट शेअर करणाऱ्या सचिन यांच्या पत्नीविषयी सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
6 / 12
सचिन खेडेकर यांच्या पत्नीचं नाव जल्पा खेडेकर असं आहे.
7 / 12
जल्पा कलाविश्वापासून दूर अन्य दुसऱ्या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्या कायम त्यांचे अपडेट्स देत असतात.
8 / 12
जल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून त्यांनी सचिन खेडेकरांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात काही लग्नाचेदेखील फोटो आहेत.
9 / 12
जल्पा एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. प्रोव्हो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचं सांगण्यात येतं.
10 / 12
जल्पा व सचिन यांनी दोन मुलेदेखील आहेत.
11 / 12
सचिन खेडेकर उत्तम अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकदेखील आहेत.
12 / 12
नेताजी सुभाषचंद्र, मुरांबा, शटर, काकस्पर्श आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांमध्ये सचिन खेडकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
टॅग्स :सचिन खेडेकरसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन