Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्याम गुलाबी...! 'दगडू'ची पत्नीसोबत रोमॅन्टिक डेट; 'या' ठिकाणी गेलाय फिरायला, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:47 IST

1 / 7
'टाईमपास', 'बालक पालक', 'टकाटक' आणि 'उर्फी' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब.
2 / 7
प्रथमेशने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
3 / 7
वैयक्तिक आयुष्यात प्रथमेश परबने २०२३४मध्ये क्षितीजा परबसोबत लग्नगाठ बांधली. सध्या हे जोडपं त्यांच्या सुखी संसारात व्यस्त आहे.
4 / 7
अशातच प्रेक्षकांचा लाडका ‘दगडू’ आपल्या कामातून वेळ काढत पत्नीसह भ्रमंती करताना दिसतोय. प्रतीजाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 7
प्रथमेश आणि क्षितीजा पुण्याला फिरण्यासाठी गेले आहेत. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 7
त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7 / 7
या फोटोंना अभिनेत्याने 'श्याम गुलाबी...', असं खास कॅप्शन दिलं आहे.
टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासेलिब्रिटी