Join us

स्मिता पाटील यांच्या बहिणींना पाहिलंत का? दिसायला अगदी हुबेहूब; एक आहे डॉक्टर तर धाकटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:36 IST

1 / 8
आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिता पाटील आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांचं सौंदर्य , अभिनय एकूणच व्यक्तिमत्व भुरळ पाडणारं होतं.
2 / 8
श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं होचं. ८० च्या दशकात स्मिता पाटील यांनी मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, बंगाली आणि कन्नडच या भाषांमध्ये काम केलं. जवळपास ८० सिनेमे त्यांच्या नावावर आहेत.
3 / 8
अतिशय स्ट्राँग,हुशार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.मात्र त्या अल्पायुषी होत्या. १९८६ साली वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांचं निधन झालं.
4 / 8
स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणातील मोठं नाव होतं. तर आई विद्याताई या सोशल वर्कर होत्या.
5 / 8
स्मिता पाटील यांच्या दोन बहि‍णींना पाहिलंय का? मान्या पाटील सेठ आणि अनिता पाटील देशमुख अशी दोघींची नावं आहेत. तिघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव होता. स्मिता यांच्या निधनानंतर दोन्ही बहि‍णींना मोठा धक्का बसला होता.
6 / 8
अनिता पाटील या स्मिता यांच्या मोठ्या बहीण आहेत. त्या नवजात शिशु तज्ज्ञ आहेत. बरीच वर्ष त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. नंतर भारतात परत येऊन त्या 'पुकार' या संस्थेशी जोडल्या गेल्या.
7 / 8
अनिता पाटील या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या आहेत. बहिणीच्या आठवणीत त्यांनी आपल्या एका नातीचं नाव स्मिता असंच ठेवलं आहे.
8 / 8
तर मान्या पाटील सेठ या स्मिता पाटील यांची धाकटी बहीण. त्या सिनेसृष्टीत कॉस्च्युम डिझायनर आहेत. तसंच त्या स्मिता पाटील फाउंडेशनचं कामही बघतात.
टॅग्स :स्मिता पाटीलमराठी अभिनेता