By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:19 IST
1 / 10मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री गिरीजा ओक व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.2 / 10कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा ब्रेक घेत गिरीजा सध्या पाँडिचेरीच्या सुंदर आणि शांत समुद्रकिनारी वेळ घालवत आहे.3 / 10 काळ्या-पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसमध्ये गिरीजा अत्यंद सुंदर दिसतेय. नैसर्गिक वातावरणात तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.4 / 10गिरिजाने या सुंदर फोटोंना 'Pondy' असं कॅप्शन दिलं. तिचे व्हॅकेशनचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.5 / 10 गिरिजाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या साधेपणाचे आणि सौंदर्याचे चाहते कमेंट बॉक्समध्ये भरभरुन कौतुक करत आहेत. 6 / 10गिरीजा ओकने पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 7 / 10अगदी नो-मेकअपमध्ये गिरीजाने स्वतःचा सहज आणि सोज्वळ लूक दाखवला आहे.8 / 10गिरीजा ही 'नॅशनल क्रश','व्हायरल गर्ल' म्हणून ओळखली जात आहे. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीतील तिचा लूक व्हायरल झाला.9 / 10या मुलाखतीतला तिचा साधा, सोज्वळ लुक नेटकऱ्यांना इतका आवडला की, नेटकऱ्यांनी तिला भारताची नवी क्रश म्हणूनच घोषित केलं.10 / 10अशातच आता अभिनेत्री नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित 'परफेक्ट फॅमिली ' वेब सीरिजचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एका मजेदार, गुंतागुंतीच्या पंजाबी कुटुंबाची झलक पाहायला मिळते.