Join us  

Flashback 2022 : प्राजक्ता माळी ते मानसी नाईक; कुणी घेतला घटस्फोट तर कोणाचा झाला ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 7:00 AM

1 / 10
२०२२ हे वर्ष लग्न, ब्रेकअप आणि घटस्फोटांमुळे चर्चेत राहिले. या वर्षात अनेक लोकप्रिय जोड्यांनी लग्नगाठ बांधली तर काही जोड्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.
2 / 10
अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर स्वतः मानसी नाईकने या वृत्ताला दुजारा देत वेगळे होत असल्याचे सांगितले होते.
3 / 10
मानसी नाईकने आपल्या पतीवर अनेक आरोपदेखील केले होते. यावर ‘इतर कोण माझ्याबद्दल काय बोलतं याचा मला फरक पडत नाही, कारण मला माहितेय मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ अशा शब्दात प्रदीपने प्रतिक्रिया दिली होती.
4 / 10
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये लव्हबर्ड म्हणून ओळखले जाणारे शिव ठाकरे आणि वीणा जगताप २०२२ या वर्षात विभक्त झाले. या पर्वातील त्यांची प्रेमकहाणी चाहत्यांनाही खूपच आवडली होती. या कार्यक्रमानंतर ते अनेकवेळा एकत्रही दिसले होते.
5 / 10
सध्या शिव बिग बॉस १६ मध्ये दिसत असून तो या पर्वातील आघाडीच्या स्पर्धकांपैकी एक आहे. या शोदारम्यान स्वतः शिवने तो आणि वीणा वेगळे झाले असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले.
6 / 10
बिगबॉस मराठी २ मध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढून टाकल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले. हे दोघेही आता वेगळे झाले असले तरीही लवकरच वीणा शिवला पाठिंबा देण्यासाठी लवकरच बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
7 / 10
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ता माळीचाही यावर्षी ब्रेकअप झाला आहे. एका पत्रकार परिषदेत तिने याबाबत खुलासा केला होता.
8 / 10
तिने सांगितले होते की एका चित्रपटाची शूटिंग सुरू असतानाच तिचा ब्रेकअप झाला. त्यामुळे ती नैराश्याचा सामना करत होती. तिने हेही सांगितले की हा काळ तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळ होता.
9 / 10
आई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसलेने अंकित मगरेसोबत ब्रेकअप केले आहे.
10 / 10
या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट करून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुपालीने अंकित बरोबर ब्रेकअप करण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
टॅग्स :मानसी नाईकप्राजक्ता माळीशीव ठाकरेवीणा जगतापरुपाली भोसले