Join us  

प्रवीण तरडेंची पत्नीदेखील आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये साकारतेय भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:02 AM

1 / 10
अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. (Photo Instagram)
2 / 10
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत. (Photo Instagram)
3 / 10
प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते नेहमी अभिमानानं सांगतात. (Photo Instagram)
4 / 10
पण तुम्हाला माहिती आहे का?, प्रवीण तरडे यांची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. (Photo Instagram)
5 / 10
‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये त्या लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Photo Instagram)
6 / 10
या सिनेमातील प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
7 / 10
दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. चाहते नेहमी त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)
8 / 10
२ डिसेंबर २००९ साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्न केलं. प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगा आहे. (Photo Instagram)
9 / 10
स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आहे. (Photo Instagram)
10 / 10
त्याचबरोबर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यात, देऊळबंद, चिंटू २ आणि व्हेंटिलेटर या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo Instagram)
टॅग्स :प्रवीण तरडे