Join us  

शुभ मंगल सावधान...! शर्मिष्ठा राऊत अडकली लग्नबंधनात

By रूपाली मुधोळकर | Published: October 12, 2020 12:35 PM

1 / 14
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत काल रविवारी लग्नबंधनात अडकली. तेजस देसाईसोबत तिने साता जन्माच्या गाठी बांधल्यात.
2 / 14
लॉकडाऊनच्या काळात शर्मिष्ठाने नव्या आयुष्याची सुरुवात केली. तिच्या लग्नसोहळ्याला काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तेवढे उपस्थित होते.
3 / 14
या लग्नसोहळयाचे फोटो शर्मिष्ठाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 14
गेल्या महिन्यात लॉकडाऊन दरम्यान शर्मिष्ठा व तेजस यांचा साखरपुडा पार पडला होता.
5 / 14
लग्नात शर्मिष्ठा पेशवाई थाटात दिसली. नववारी पातळ, त्याला साजेसा शृंगार अशा लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
6 / 14
शर्मिष्ठाचा पती तेजस हा तेजस हा ‘बोस’ कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. हे एक अरेंज मॅरेज आहे.
7 / 14
शर्मिष्ठाची बहीण सुप्रियाने तेजस व शर्मिष्ठाची भेट घालून दिली होती. पहिल्या भेटीतच तेजसला शर्मिष्ठा आवडली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली, पण शर्मिष्ठाने थोडा वेळ घेतला. पुढे काही महिन्यांनी होकार दिला.
8 / 14
तेजस फार मालिका पाहत नाही. त्यामुळे शर्मिष्ठा कोण आहे, हेच त्याला माहित नव्हते. शर्मिष्ठाचे स्थळ गेल्यावर त्याने तिचा ‘चि व चि. सौ. कां.’ हा चित्रपट पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या.
9 / 14
तेजसचे चित्रपटसृष्टीशी काहीही नाते नसले तरी कधीकाळी तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळे क्षेत्र असून शर्मिष्ठा व त्याला सूर जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत.
10 / 14
शर्मिष्ठाने ‘मन उधाण वा-याचे’मध्ये साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी’मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती.
11 / 14
शर्मिष्ठठाने मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील काम केले आहे. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे.
12 / 14
दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.
13 / 14
बिग बॉस मराठी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये शर्मिष्ठा दिसली होती.
14 / 14
शर्मिष्ठा सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठी