Join us  

आर्ची उर्फ रिंकू राजगुरू विना मेकअप लूकमध्येही दिसते झक्कास..!, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 7:00 AM

1 / 11
अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. 
2 / 11
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.
3 / 11
तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
4 / 11
नुकताच रिंकूने नो मेकअप लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
5 / 11
रिंकूच्या नो मेकअप लूकला खूप पसंती मिळते आहे.
6 / 11
लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे.
7 / 11
या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.
8 / 11
रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
9 / 11
या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली.
10 / 11
नुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.
11 / 11
या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2