Join us  

PHOTOS: ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या या फोटोंवरून हटणार नाही नजर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 3:06 PM

1 / 11
‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा आठवतोय? आठवत असेल तर या चित्रपटात डॉ. आनंदी बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्रीही आठवत असेलच
2 / 11
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाईंची भूमिका साकारली होती.
3 / 11
‘आनंदी गोपाळ’मध्ये भाग्यश्रीने साकारलेल्या भुमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. हीच भाग्यश्री आता तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
4 / 11
होय, भाग्यश्रीने एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
5 / 11
पांढºया रंगाच्या साडीत भाग्यश्रीने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
6 / 11
भाग्यश्रीच्या या फोटोंवरून नजर हटत नाही. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मस्त, लयभारी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 11
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाआधी भाग्यश्रीने ‘बालक पालक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
8 / 11
पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ या चित्रपटात देखील ती झळकली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सुद्धा प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.
9 / 11
भाग्यश्रीने मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ती अभिनयाकडे वळली.
10 / 11
भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
11 / 11
भाग्यश्री आपल्या फिटनेसमुळे अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. मध्यंतरी ती रोप मल्लखांब शिकली. याचा सराव करतानाचे व्हिडीओ तिने शेअर केले होते.
टॅग्स :भाग्यश्री मिलिंदआनंदी गोपाळ