Join us  

न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरात पुन्हा एकदा आली चर्चेत, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 7:00 AM

1 / 11
मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. वनिताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
2 / 11
आता वनिताने ग्लॅमरस फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 11
पुन्हा एकदा वनिताने ग्लॅंमरस फोटोतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
4 / 11
वनिता खरातच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
5 / 11
वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले होते.
6 / 11
तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने पोस्टसोबत लिहिले होते. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले.
7 / 11
वनिता खरातच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने कबीर सिंग चित्रपटात मोलकरणीची भूमिका साकारली होती.
8 / 11
या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती.
9 / 11
याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये देखील पहायला मिळते आहे.
10 / 11
वनिता खरातचे इंस्टाग्रामवर ४३ हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
11 / 11
वनिताने नाटकातही काम केले आहे.
टॅग्स :वनिता खरातकबीर सिंगशाहिद कपूर