Join us  

मराठीतील 'लेडी बॉस' उषा नाडकर्णी यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? राहतो अत्यंत साधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 6:00 AM

1 / 9
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी.
2 / 9
खाष्ट परंतु, तितकीच खट्याळ अशा सासूची भूमिका साकारुन उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं.
3 / 9
अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या उषाताईंनी 'पवित्र रिश्ता' सारख्या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
4 / 9
अलिकडेच उषाताईंना बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्या किचन कल्लाकार या शोमध्येही सहभागी झाल्या होत्या.
5 / 9
किचन कल्लाकार या कार्यक्रमात अलिकडेच उषाताई सहभागी झाल्या होत्या.यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा लेक आला होता. तेव्हापासून त्यांच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
6 / 9
उषा नाडकर्णी यांना एक मुलगा असून तो कलाविश्वात फारसा सक्रीय नाही.
7 / 9
उषा नाडकर्णी यांच्या लेकामुळेच आज संपूर्ण कलाविश्वात त्यांना आऊ म्हणून हाक मारली जाते. लहानपणापासून त्यांचा मुलगा त्यांना आऊ असंच म्हणतो. याच नावाने पुढे कलाकारही त्यांना बोलवू लागले.
8 / 9
उषाताईंच्या लेकाचं नाव अभिजीत नाडकर्णी असं आहे. अभिजीत अत्यंत साधा असल्याचं पाहायला मिळतं.
9 / 9
सोशल मीडियावरही अभिजीतचा फारसा वावर नाही. त्यामुळे त्याचे फार मोजके छायाचित्रच पाहायला मिळतात.
टॅग्स :उषा नाडकर्णीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन