Join us  

मृणाल कुलकर्णी यांना व्हायचं नव्हतं अभिनेत्री; पूर्वी 'या' क्षेत्रात करत होत्या काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 1:50 PM

1 / 10
मराठी कलाविश्वातील चिरतरुण अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी.
2 / 10
अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका अशा विविध भूमिका पार पाडत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांच्या सौंदर्याची आजही कलाविश्वात चर्चा रंगते.
3 / 10
नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
4 / 10
आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. मात्र, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्या एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होत्या. हे फार कमी जणांना माहित आहे.
5 / 10
मृणाल कुलकर्णी यांनी कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळाला. प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकर यांची नात असलेल्या मृणाल यांचे वडील पुण्यातील एस.पी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तर आई शाहू महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवायच्या.
6 / 10
सुरुवातीच्या काळात मृणाल यांनीदेखील आई-वडिलांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायला सुरुवात केली.
7 / 10
शाहू महाविद्यालयात त्या पार्ट टाइम जॉब म्हणून लेक्चररची नोकरी करत होत्या.
8 / 10
आई-बाबांना लहानपणापासून शिकवतांना पाहिलं आहे. त्यामुळे मलाही प्राध्यापक व्हायचं होतं, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
9 / 10
दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेतून मृणाल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली.
10 / 10
मृणाल यांच्या अवंतिका आणि सोनपरी या दोन मालिका तुफान गाजल्या.
टॅग्स :मृणाल कुलकर्णीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा