Join us  

ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:09 AM

1 / 8
२०२० चा लॉकडाऊनचा काळ. जेव्हा अख्खं जग घरीच बसून होतं. अनेक लोक मोठ्या संकटाला तोंड देत होते. नैराश्याने अनेकांना ग्रासलेलं होतं. याच नैराश्यात पुढचा मागचा विचार न करता काहींनी टोकाचं पाऊलही उचललं होतं. बॉलिवूडचा सुशांतसिंग राजपूत हे त्यापैकीच एक उदाहरण.
2 / 8
सुशांतच्या आत्महत्येनंतर पुढच्याच महिन्यात आणखी एका बातमीने मराठी सिनेसृष्टी हादरली होती. अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यातही लॉकडाऊनमध्ये वादळ आलं. मयुरीच्या नवऱ्याने नैराश्यात गळफास लावून आत्महत्या केली. आशुतोष भाकरे असं तिच्या नवऱ्याचं नाव होतं.
3 / 8
मयुरी तेव्हा केवळ २७ वर्षांची होती तर आशुतोषने ३२ व्या वर्षी आपलं जीवन संपवलं. २०१६ मध्ये त्यांचं लव्हमॅरेज झालं होतं आणि लग्नाच्या चार वर्षांनंतर आशुतोषने हे टोकाचं पाऊल उचललं.
4 / 8
पतीच्या निधनानंतर मयुरी पूर्णपणे खचून गेली होती. ज्या व्यक्तीसोबत तिने उभ्या आयुष्याची कल्पना केली होती तो व्यक्ती अर्ध्या वाटेतच सोडून गेला. पण मयुरी त्यातूनही उभी राहिली.
5 / 8
आशुतोष डिप्रेशनमध्ये होता हे तिला माहित होतं. त्याची ट्रिंटमेंटही सुरु होती. त्याला घरातील सर्वच सदस्य यातून बाहेर येण्यासाठी मदत करत होते. मात्र तरीही त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
6 / 8
मयुरी देशमुखने आपल्या करिअरची सुरुवात 2014 साली मराठी सिनेमा 'डॉ प्रकाश बाबा आमटे' मधून केली. तिला खरी ओळख मिळाली ती 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून.
7 / 8
पतीच्या निधनानंतर मयुरीने काही वर्षांनी हिंदीत पदार्पण केलं. 'इमली' या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली. यातील तिची व्यक्तिरेखा आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
8 / 8
आज मयुरीला अनेक जण दुसऱ्या लग्नाबद्दल विचारतात. मात्र ती म्हणते,'माझं आजही आशुतोषवर खूप प्रेम आहे. तो कायम माझ्याजवळ आहे. त्याला लहान मुलं खूप आवडायचे. म्हणूनच मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे.
टॅग्स :मयुरी देशमुखमराठी अभिनेतापरिवार