Join us  

"...अन् इनोव्हा कारची नॅनो झाली", मराठी अभिनेत्रीचा असा झालेला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:48 PM

1 / 8
मराठीतील एक्सप्रेशन क्वीन मानसी नाईक (Manasik Naik) लाखो चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. तिचं नृत्य कौशल्य पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले. 'वाट बघतोय रिक्षावाला' गाणं तर आजही तितक्याच जोरात वाजतं.
2 / 8
काही हिट गाणी दिल्यानंतर मानसी वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आली. प्रदीप खरेराशी तिने लव्हमॅरेज केलं. सोशल मीडियावर दोघंही खूप चर्चेत असायचे. मात्र नंतर मानसीने प्रदीपवर फसवणूकीचे गंभीर आरोप लावत घटस्फोट घेतला.
3 / 8
आयुष्यात घडलेल्या अनेक घडामोडींनंतर ती पुन्हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने नवीन घरही घेतलं. तसंच पुन्हा प्रेम आणि लग्न करायचीही तिची इच्छा आहे.
4 / 8
दरम्यान गेल्या वर्षी मानसीने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यावर खुलेपणाने चर्चा केली होती. भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये तिने अनेक खुलासे केले. यावेळी मानसीने तिच्या आयुष्यात झालेला भयानक अपघाताचाही उलगडा केला.तब्बल २ वेळा मानसी मृत्युच्या दारातून परत आली आहे.
5 / 8
मानसी म्हणाली होती की, 'रात्रीच्या वेळी एक्स्प्रेस हायवेवरुन जात असताना दोन वेळा माझा गंभीर अपघात झाला. एका अपघातात माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत होती. तेव्हा माझ्या डोळ्याला मार बसला होता. सुदैवाने मी डोळे बंद करुन गाडीत बसले होते त्यामुळे मी थोडक्यात बचावले.
6 / 8
माझे बॉडीगार्ड पुढे बसले होते. त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. माझ्यासोबत असलेली मुलगी सुद्धा जखमी झाली होती. आमची गाडी ट्रॅकमध्ये घुसली होती. इन्होवा कारची नॅनो कार झाली.
7 / 8
तेव्हापासूनच मी ठरवलं की रात्रीचा प्रवास करायचाच नाही. कारण ड्रायव्हरला झोप लागू शकते. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मदत केली. कुठेही मीडियाला कळू दिलं नाही.
8 / 8
गाडीची अवस्था पाहून देव आपल्याला खूप संधी देतो असं मला वाटलं. या अपघातानंतर माझा देवावरचा विश्वास अजून वाढला. स्वामींच्या कृपेने मला नवीन आयुष्यच मिळालं.
टॅग्स :मानसी नाईकमराठी अभिनेताअपघात